वाळूजमहानगर – कपड्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरवरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत मानासिक व शारिरिक छळ करुन 18 वर्षीय नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृृत्त केले. या प्रकरणातील आरोपी पती,सासु, सासरा,नंणद या चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात होऊन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केल्याने ते आता न्यायालयीन कोठडीत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरती हीचे 2022 मध्ये वडगाव (को.) येथील योगेश कारभारी गाडेकर यांच्या सोबत लग्न झाले होते. काही दिवस आरतीला सासरकडील मंडळीनी चांगली वागणुक दिली. मात्र त्यांनतर तिला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण करत असे. त्यामुळे आरतीच्या आई वडीलांनी पती योगेश याची समजूत काढली होती. त्यांनतर काही दिवस चांगली वागणुक दिली मात्र पुन्हा लग्नात हुंडा दिला नाही. कपड्याची दुकान टाकायचे असून माहेरावरून दोन लाख रुपये घेवून ये. असे म्हणून पती योगेश, सासु, सासरे, नंणद यांनी आरतीला दरारोज शिवीगाळ करीत मारहाण करीत होते. त्यांनतर आरतीची मोठी बहीण व तीचे पती यांनीही सामजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना घरातून हकलून दिले. शुक्रवारी (ता.9) सप्टेंबर रोजी योगेशने आरतीला माहेरी जिकठाण येथे आणू सोडले व मला दुकान कपड्याची दुकान टाकण्यासाठी 2 लाख रुपये द्या, तरच मी हिला नांदविण्यास घेवून जाईल. असे म्हणत योगेश निघुन गेला. त्यांनतर आरतीच्या वडीलांनी योगेश यास फोन करून पैसे देतो. असे सांगून समजूत काढली. त्यांनतर मंगळवारी (ता.13) रोजी योगेश हा सासरी येवून आरतीला त्रास देणार नाही. मला माफ करा. असे म्हणून तीला घेवून गेला. मात्र त्यांनतर योगेश, सासु, सासरे, नंणद यांनी तीला त्रास दिला. त्यामुळे आरतीने रागच्या भरात राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अॅगला ओढणीच्या सह्याने गळफास घेतला. तिच्या या आत्महत्येस सासरकडील मंडळींना जबाबदार धरून कारभारी गाडेकर यांनी फिर्यादी दिल्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरतीचा पती योगेश गाडेकर, सासरा कारभारी गाडेकर, सासु लक्ष्मीबाई गाडेकर, नणंद ज्योती लाड. या चौघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पुढील तपास सपोनि गोतम वावळे करीत आहे.