February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.12) – लग्न झाल्यानंतर काही महिने चांगले वागवले. व नंतर माहेर होऊन पैसे आण, या मागणी करिता घरातील काम करण्यासाठी दबाव टाकण्यासह दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवून तुला काय करायचे ते कर, अशी धमकी देत एका 28 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने पतीसह सासरकडील दोघांवर सोमवारी (ता.11) रोजी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, समता कॉलनी शिवाजीनगर वाळूज येथील प्रियंका किरण झावरे 28, या विवाहितेची 2011 मध्ये किरण पांडुरंग झावरे रा. वासुंदे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी ओळख होऊन प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर घरच्यांच्या सहमतीने लग्न होऊन बजाजनगरात राहण्यासाठी आली. लग्नानंतर सहा महिन्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तुझ्या वडिलांनी लग्नात आम्हाला काहीच दिले नाही. असे म्हणून मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. दरम्यान त्यांना दोन मुलं झाली. त्यानंतर 2021 मध्ये किरण झावरे याचे शेजारी महिलेबरोबर सूत जुळले. याबाबत तिने याबाबत सासूला सांगितले. सासूने किरणची बाजू घेत त्याने काय फरक पडतो, झाली गोष्ट होऊन गेली. त्यानंतर ही माहिती तिने माहेरी सांगितली. त्यामुळे माहेरच्या लोकांनी किरण झावरे व त्याच्या आईला समजावण्याचा प्रयत्न केला असता, काही ऐकून न घेता तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या मुलीला घेऊन जा हे बोलून अपमानित केले. हरप्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकत नसल्याने प्रकरण पोलीस ठाणे व भरोसा सेल कडे गेले. परंतु ते तेथेही हजर झाले नाही. अनेक प्रकारे प्रयत्न करूनही तो प्रियंकाला नांदवत नसल्याची खात्री होताच प्रियंका किरण झावरे हिने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आरोपी पती किरण पांडुरंग झावरे व मंगल पांडुरंग झावरे यांच्या विरुद्ध कलम 498 अ, 323, 504, 506, 34 भादंवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *