February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.25)- बजाजनगर येथील संत रविदास महाराज मंदिर परिसरात चर्मकार समाजाच्या उपवर वधू-वरांचा भव्य परिचय मेळावा रविवारी (ता.7) जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

संत शिरोमणी गुरू रविदास महाराज बहुद्देशीय संस्था व आदर्श महिला सेवाभावी संस्था यांच्यासंयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक गजानन नांदूरकर, प्रा. गोविंद ढगे, अशोक लोहकरे, सोपन सातपुते, विष्णुपंत पदमने, महादेव डांबरे, प्रकाश पाखरे हे उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात वधु-वरांच्या नावनोंदणीसाठी कुठलेही शुल्क आकारणी करण्यात येणार नसून मेळाव्यास येणार्‍यांसाठी अल्पोपहारांची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी आलेल्या सर्वच वधु-वरांनी आपला बायोडाटा सह पासपोट आकाराचे फोटो सोबत आणावा. या मेळव्यात उपवर वधुवरांसह विधूर-विधवानाही सहभाग घेता येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक उत्तम वझळे, जितेंद्र आंबेकर, शिला वाघमारे, दिनकरराव वाघमारे, पंकज खंडारे, प्रल्हाद माने, सदाशिव वाघमारे, श्रीकृष्ण अंबाळकर, संजय इंगळे, अशोक गणगे, शहाजी गवळी, नागोराव वाघमारे, दत्ता राजगुरू यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *