March 26, 2026


वाळूज महानगर, (ता.28) – वाळुजकडुन नरसापुरकडे दुचाकीवर जात असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.28) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,
नानासाहेब परसराम शिंदे (36), रा.नरसापुर ता.गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा दुचाकी (एम एच 20 ए ई – 0152) वरून जात असताना शुक्रवारी (ता.28) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याला अचानक चक्कर आली. त्यामुळे तो दुचाकीवरून खाली पडून जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच लिंबे जळगाव येथील उपस्थित असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ धाव घेत जखमी नानासाहेब शिंदे याला घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेची नोंद वाळुज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *