वाळूजमहानगर (ता.30) – घाणेगाव शिवारातील गुड इयर कंपनीजवळ दुर्मिळ जातीचा अजगर साप सर्पमित्र लक्ष्मण गायके व दत्ता जाधव (मामाभांजे) व सर्पमित्र प्रसाद गायके यांनी पकडला. या वेळी सापांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
वाळूज औद्योगिक परिसरातील गुड इयर कंपनी जवळ पकडलेला हा आजगर अनेकांच्या हातात देत सापांविषयी मार्गदर्शन करण्यात येऊन साप न मारण्याचे आवाहन यावेळी सर्पमित्रांच्या वतीने करण्यात आले. सरपंच केशव गायके, तंटामुक्ती अध्यक्ष बाळा भाऊ गोरे, नारायण शुक्ला, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उपअध्यक्ष ज्ञानेश्वर औटे, कृष्णा फाळके, विनोद कळवणे, अर्जुन गायके, मंगेश गायके, श्रीकांत तळपे, विजय शुक्ला, सुनील गोरे यांचा उपस्थिती होती. शेवटी पकडलेला अजगर दौलताबाद वनविभाग येथे वन अधिकारी मुळे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात येऊन अजगराला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. या वेळी वनरक्षक आर. एस. मुळे, वनमजुर हजारे काका, रघुभाऊ, मिथुन ढंगारे, सचिन म्हस्के पाटील, गणेश बनकर उपस्थित होते.