March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.8) – नववी व दहावी वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी फुस लावून अपहरण केले. वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या अपहरण प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाडी (आंबेगाव) पो. घाणेगाव येथील श्रावणी आण्णासाहेब बनकर (वय 16 वर्ष 2 महिने) ही नववी वर्गात शिकते. तिचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी 17 ऑक्टोंबर 2024 रोजी अपहरण केले. परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. रंग गोरा, उंची पाच फुट, चेहरा गोल, केस काळे असे तिचे वर्णन आहे.
तसेच घाणेगाव येथील संघर्षनगरात राहणारी
पुनम अनिल शिंदे (वय 15 वर्ष) हिला कोणीतरी अज्ञात आरोपीने 5 फेब्रुवारी 2025 रोजी फूस लावून पळवून नेले. शिक्षण 10 वी, रंग सावळा, उंची 5 फुट, शरीर सडपातळ. असे पूनम शिंदे हिचे वर्णन आहे. या दोन्ही विद्यार्थिनींच्या अपहरण प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थिनींचा शोध पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद अबुज हे घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *