वाळूजमहानगर, (ता.30) – वाळूज परिसरातील घाणेगाव येथे विभागीय सर्पमित्र संमेलन रविवारी (ता.27) रोजी घेण्यात आले. यावेळी अकोला, अमरावती, हिंगोली, नागपूर, नारायणगाव पुणे, शिक्रापूर, चंद्रपूर, औंढानागनाथ, चिमेगाव, औरंगाबाद, बजाजनगर येथील सर्पमित्रांनी आपले अनुभव व कथन व्यक्त केले व नंतर हिंगोलीचे सर्पमित्र विजयराज पाटील यांनी वन्य प्राणी व सापा विषयी सविस्तर जनजागृती व मार्गदर्शन करून समाजामध्ये असलेली भीती व गैरसमज दूर केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक घाणेगाव येथील सर्प मित्र वन्यजीव रक्षक लक्ष्मण गायके व दत्ता जाधव (मामा -भांजे) यांनी पाहुण्यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्पमित्र बाळू ढोके, नागेश महाराज, धुरपत दराडे, अरंजिव सोनटक्के, विश्वजीत सोनटक्के, ज्ञानेश्वर टाळे, व महिला सर्पमित्र प्रतिभा ठाकरे, संघटना पाटील, सुनिता सोनटक्के, चैताली भस्मे, नागेश्वरी केदार, पूजा बांगर, शिवानी गौरकर, व गावातील सरपंच केशव आप्पा गायके, उपसरपंच सुधाकर अण्णा गायके, ग्रामपंचायत सदस्य सदू फाळके, ज्ञानेश्वर गायके व गावचे चेरमन बाळूनाना गोरे, व्हाईस चेरमन ज्ञानेश्वर औटे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय शुक्ला, सुनील साळुंखे, बाळासाहेब गाडे पाटील, बजाजनगर, विनोद काळवणे, श्रीकांत तळपे, संदीप तंटक, अजय गायके, रमेश गायके, संताराम गायके, ज्ञानेश्र्वर मालकर, कांताराम गायके, विजु कळवणे, विष्णू गवळी आंबेगाव, बद्रीनाथ जाधव आसेगाव, तुकाराम सामसे जोगेश्वरी,रामराव धनेधर वसु सायगाव, व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.