वाळूजमहानगर (ता.23) – वाळूज औद्योगिक परिसरातील घाणेगाव येथे घोणस जातीचे व नाग असे चार विषारी साप सर्पमित्र मामा- भांजे यांनी बुधवारी रोजी पकडून दौलताबाद वन विभागाच्या स्वाधीन केले.
सर्पमित्र लक्ष्मण गायके व दत्ता जाधव (मामा भांजे) घानेगावकर यांनी घाणेगाव परिसरातून बुधवारी रोजी
पकडलेले अती विषारी घोणस जातीचे दोन साप व विषारी नाग दोन असे एकूण चार साप पकडले व दौलताबाद वन विभाग अधिकारी आर एस मुळे व वनपाल हजारे काका, वनमजूर रघु भाऊ, विनायते मामा यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी घाणेगाव येथील चेअरमन बाळू गोरे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर औटे, माजी उपसरपंच नारायण शुक्ला, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा फाळके, कृष्णा गायके, विनोद काळवणे, बाळू गायके, आसेगाव येथील बद्रीनाथ जाधव हे सर्व उपस्थित होते.