
वाळूज महानगर, ता.31 (बातमीदार) – मच्छरदाणी बांधून घराच्या गच्चीवर झोपलेल्या तीघींच्या शेजारी नग्न अवस्थे येऊन त्याच्या मन्नास लज्जा वाटेल असे कृत्यू करून विनयभंग केल्याची घटना रविवारी (ता.29) रोजी रात्री घाणेगाव येथे घडली. 
घाणेगाव येथील एका मळ्यात राहणारी 43 वर्षीय महिला, तीची मुलगी व नात अश्या तीघी घराच्या गच्चीवर मच्छर दाणी बाधुन झोपल्या होत्या. रविवारी (ता.29) रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास शेजारी राहणारा अमोल मिसाळ (28) हा नग्न अवस्थे येऊन मच्छर दाणीत येऊन घुसला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने आरडा ओरड केल्याने सतिष उबरहांडे, सागर हजारे हे मदतीला धावले. त्यावेळी अमोल मिसाळ हा पळून जात असताना त्याला नग्न अवस्थेत पकडले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कलम 354 (अ) भादवीसह पोस्को कायदा 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज राठोड करीत आहे.
