
वाळुज महानगर, (ता.25) – एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीला घाटातून ढकलून देऊन तिचा खून केला. ही अत्यंत खळबळ जनक घटना दौलताबाद घाटात गुरुवारी 24 जुलै रोजी घडलेली ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील मांडकी येथील सुनील खंडागळे यांचे छत्रपती संभाजीनगर जवळील माळीवाडा येथील दिपाली गणेश आस्वार (वय 24) या तरुणीशी सूत जुळले होते. गुरुवारी दोघेही दौलताबाद परिसरात फिरायला गेले असता दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या माथेफिरू प्रियकराने प्रियसीला घाटावरून ढकलून दिले. ती उंचावरून खोल पडल्याने गंभीर जखमी होऊन गत प्राण झाली. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या महिला हेड कॉन्स्टेबल वाणी, हरिभाऊ घुगे आदींनी घटनास्थळी धाव घेत पदमपुरा अग्निशामन दलास पाचारण केले.
अग्निशमन दलाच्या सूरज राठोड, संदीप चव्हाण, दिनेश मुंगसे, अजिंक्य भगत, दीपक गाडेकर, उमेश भोसले, नंदकिशोर घुगे, दीपक वरठे आदींनी 50 फूट रस्सीच्या सहाय्याने खाली उतरून प्राण झालेल्या तरुणीला बाहेर काढून पोलीसाच्या ताब्यात दिले.
दरम्यान दौलताबाद पोलिसांनी आरोपी प्रियकर सुनील खंडागळे यास ताब्यात घेतले आहे.
