February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून घराला आग लावून घर व घरात झोपलेल्या 65 वर्षीय वृद्ध इसमास जाळण्याचा प्रयत्न केला. ही अत्यंत खळबळ जनक घटना रांजणगाव (शेणपुंजी) येथील गेंदाईनगरात शुक्रवारी (ता.16) सकाळी उघडकीस आली.

याबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात जळताची नोंद करण्यात आली आहे. या जळीचा प्रकरणी पोलिसांना दिलेल्या एका निवेदनात भाऊसाहेब तेजराव पांढरे, (वय 65) रा. गेंदाईनगर, रांजणगाव (शेंणपुंजी) ता. गंगापूर यांनी असे म्हटले आहे की, आम्ही दोघे वयोवृद्ध पती-पत्नी रांजणगाव (शेणपुंजी) येथील गेंदाईनगरात राहतो. पत्नी आजारी असल्याने बुधवारी ती मुलीकडे हसूल, औरंगाबाद येथे गेलेली होती. त्यामुळे भाऊसाहेब तेजराव पांढरे हे बुधवारी (ता.14) एकटेच घरात झोपलेले होते. रात्री अचानक रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घरामध्ये धूर झाला. त्यामुळे त्यांची झोपमोड झाली, उठून पाहिले तर येण्या-जाण्यासाठी असलेल्या एकमेव दरवाजाला बाहेरून आग लागलेली होती. त्यामुळे पांढरे हे चांगलेच घाबरून गेले त्यांनी घरातील पाण्याने कशी-बशी दरवाजाची आग विझवली. या आगीत घराचा दरवाजा व घरातील इतर साहित्य जळाले. ही आग वेळीच विझविल्याने पुढील अनर्थ टळला. नसता भाऊसाहेब पांढरे यांचा जीव गेला असता. घटनेनंतर भाऊसाहेब पांढरे यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार अर्ज दिला. त्यात म्हटले आहे की, माझ्या घराला आग लावून मला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, ही नम्र विनंती. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.16) रोजी अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *