वाळूजमहानगर, ता.25 – सिडको वाळूज महानगर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरासमोर उभ्या असलेल्या दोन क्रेटा कंपनीच्या कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या दोन्ही घटना बुधवारी (ता.25) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्या. या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातवरण पसरले असून, पोलीसांनी गस्त घालण्याची मागणी होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
सिडको वाळूज महानगर येथील स्वामी समर्थनगर येथे राहणाऱ्या संगीता कोटमे त्यांनी नेहमी प्रमाणे मंगळवारी क्रेटा कार (एम़एच 20, ईवाय -8733) ही लॉक करुन उभी केली होती. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या घरा जवळ एक आय 20 कार आली. त्यातील एक जण खाली उतरला. त्यानंतर तो कोटमे यांच्या कारच्या स्टेरिंगचे हॅण्डल लॉक तोडून कार मध्ये बसुन निघून गेला. त्यानंतर चोरट्यांनी ए एस क्लब तापडीया इस्टेट येथील श्रीरंग पांडुरंग शेळके यांच्या घरा जवळील त्यांनी त्यांची क्रेटा कार (एम़एच 20′ एफ़ जी-6988) चे लॉक तोडून तीन्ही कार घेऊन सोलापुर धुळे महामार्गच्या दिशेने निघुन गेले. ही सर्व घटना सीसी टिव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी श्रीरंग शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल असुन पुढील तपास पोउपनि प्रविण पाथरकर हे करीत आहे़.