February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.14) – सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात स्वयंपाक करीत असताना 26 वर्षीय तरुणांनी घरात घुसून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. ही घटना गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तिसगाव येथे घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथे अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणारी 16 वर्षीय मुलगी कुटुंबासह तिसगाव येथे राहते. तिसगाव येथील आरोपी अभिषेक दौलत कसुरे (वय 26) हा गेल्या 6 महिन्यापासून तिचा पाठलाग करून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्याशी लग्न कर’ असा तगादा लावत आहे. गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी स्वयंपाक करत असताना आरोपी अभिषेक कसुरे याने घरात घुसून तु माझ्याशी लग्न करण्यासाठी नकार का देत आहे असे म्हणून तिचा मीनभंग केला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अभिषेक दौलत कसुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई-वडिलांनी सांगितले होते समजून –
आरोपी अभिषेक कसुरी हा पाठलाग करून लग्नाचा तगाता लावत असल्याची बाब पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितली होती. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी त्याच्या आई-वडिलांना व त्याला आमच्या मुलीच्या मागे लागू नको. ती नाबालिक आहे. आम्हाला आत्ताच तिचे लग्न करायचे नाही. असे समजावून सांगितले होते. परंतु तरीसुद्धा तो तिचा पाठलाग करतच होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *