
वाळुज महानगर (ता.30) – अंबेलोहळ येथील घरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून जवळजवळ अर्धा क्विंटल को वंशाचे मांस व तीन सुरे असा साडेसहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला. की कारवाई सोमवारी 29 डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबेलोहळ येथे गो वंशाची कत्तल करून त्याचे मांस विक्री केल्या जात आहे. या माहितीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस अंमलदार नितीन इनामे, समाधान पाटील, यांच्या पथकाने सोमवारी 29 डिसेंबर रोजी छापा मारला असता, आंबेलोहळ येथील मच्छी खडक गल्लीत राहणाऱ्या इमरान जलाल सय्यद याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातील हॉलमधील पंलगाखाली प्लास्टीक गोणी मध्ये कापलेले गोवंशचे तुकडे दिसले. तसेच किचनमधील फ्रिज मध्ये कापलेले गोवंश मांस व 3 सुरे मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी 6 हजार 645 रुपये किमतीचे 44 किलो 300 कि. ग्रॅम व तीन सुरे असा मुद्देमान जप्त केला.याप्रकरणी पोलीस अंमदार संदिप प्रकाश तागड यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी इमरान जलाल सय्यद वय 32 वर्षे व्यवसाय व्यापार रा. खडक गल्ली, आंबेलोहळ ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरुद्ध कलम 325 बीएनएस सह कलम 5 (सी), 9(अ), 10 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातच कापला बैल –
पोलिसांनी आरोपी इमरान जलाल सय्यद याला ताब्यात घेऊन गोवंश मांस कोठुन आणले. याबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, रविवारी 28 डिसेंबर रोजी लासुर स्टेशन येथील बाजारातुन एक बैल विकत घेवुन आलो होतो. आज रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास राहते घरात बैलाची कत्तल केली आहे. असे त्याने सांगीतले. त्यानंतर पोलिसांनी वजन काट्यावर गोवंश मांसाचे वजन केले असता ते 44.300 कि. ग्राम भरले.
