February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.27) – अण्णाभाऊ साठेनगर वाळूज येथील भाजीपाला विक्री करणाऱ्या रंजना दिलीप दांडगे या पती, मुलगी व जावई यांच्यासह घरात झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने मिळून 1 लाख 54 हजार रुपये किमतीचा ऐवज 9 नोव्हेंबर 2022 रोजी लंपास केला होता. या घरफोडीचा वाळूज पोलिसांनी छडा लावून दोन विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 81 हजार रुपये किमतीचा चोरीतील मुद्देमाल शुक्रवारी (ता.27) रोजी जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 10 नोव्हेंबर 2022 रोजी रंजना दिलीप दांडगे वय 50 वर्ष धंदा भाजीपाला विक्री रा. बौद्ध विहाराच्या पाठीमागे साठेनगर वाळुज यांनी तक्रार दिली होती की, 9 नोव्हेंबर रोजी त्या व त्यांची पती व मलगी, जावई असे घरात जेवन करुन घराचा कडीकोंडा आतुन लावून रात्री अंदाजे 11 वाजता झोपले. त्यानंतर सकाळी 5 सुमारास झोपेतून उठल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या चोरीमध्ये 1 लाख 24 हजार 600 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागीणे व 30 हजार रुपये रोख असे एकूण 1 लाख 54 हजार 600 रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या किचनच्या आतून लावलेला दरवाजाची कडी कोंडा उघडुन घरात प्रवेश करुन चोरुन नेला. याबाबत वाळुज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला व तपास पो.उप-निरीक्षक संदीप शेवाळे यांच्याकडे देण्यात आला. पुढील तपासात पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे व त्यांचे सोबत विशेष पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावला. व दोन विधी संघर्ष बालक यांचा शोध घेऊन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. व गुन्ह्यातील चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागीण्यापैकी 81 हजार रुपये किमतीचे सोन्याचे काही दागीणे हे वाळूज येथील त्यांच्या बहिनीच्या राहते घराच्या बाजुला सहान जागेत लपुन ठेवल्याचे सांगीतल्याने तो माल दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आला.
                    यांनी केली कामगिरी
ही कामगीरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त दिपक गिर्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळुज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस अंमलदार आनंद वाहुळ, नितीन धुळे, विजय पिंपळे, श्रीकांत सपकाळ, गणेश लक्कस, किशोर साबळे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *