
वाळूज महानगर – देशभरात नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात विविध उपक्रम राबवले गेले. तसेच देखाव्याचे प्रात्यक्षिक केले. असाच एक अनोखा उपक्रम “घडी भर बसा आणि पोटभर हसा” हा मनोरंजन व जनजागृतीवर आधारित कार्यक्रम वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरिज लिमिटेड कंपनीने 8 सप्टेंबर 2022 रोजी घेऊन कामगार व कर्मचाऱ्यांसाठी समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला.
व्यसनमुक्ती व जनजागृतीवर आधारित हा कार्यक्रम
डॉ. महादेव संकपाळ (बाबा हिंदुस्तानी) व संचाने सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.
यावेळी डॉ. महादेव संकपाळ यांनी गायनातून व हास्य विनोदातून व्यसनाचे दुष्परिणाम समजून व पटवून दिले.
यावेळी इप्का लॅबोरेटरिज लिमिटेड कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख व्यंकट मैलापुरे म्हणाले की, व्यसन म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण, कोणतेही व्यसन सहजासहजी सुटत नाही. गुटखा, तंबाखू, दारु या व्यसनांमुळे बेचिराख झालेले संसार आपण बघतो. जगभरात 60 लाख लोक दरवर्षी या व्यसनामुळे जीव गमावतात. त्याला एकमेव कारण म्हणजेच आपली संगत. वाईट संगत आपणाला डायरेक्ट नरकात घेऊन जाते. असेही ते म्हणाले. याप्रसंगी कंपनीचे संजय चौबे, कमलेश जैन, निलेश त्रिवेदी, नानासाहेब गायकवाड, एकनाथ पवार, गिरीधर गायकवाड, अजिनाथ सुरवसे तसेच कामगार व कर्मचाऱ्यांनी या समाज उपयोगी कार्यक्रमाचा लाभ घेतला.