वाळूजमहानगर ता.30) – महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा वाळूजतर्फे मौजे घाणेगाव येथे छोटेखानी कार्यक्रम घेऊन 15 आक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान देशातील निवडक 8 जिल्हांमध्ये अंमलबजावणी होत असलेल्या ” आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरणाची मोहीम” अंतर्गत जनजागरण मोहीम राबवण्यात आली.
यावेळी शाखा व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी या अंतर्गत येणार्या विविध आर्थिक व वित्तीय समावेशनाच्या योजनांचा सविस्तरपणे माहिती दिली. व असंघटित तसेच आर्थिक दृष्टीने कमकुवत वर्गासाठी असलेल्या पंतप्रधान जीवन ज्योती, पंतप्रधान जीवन सुरक्षा, अटल पेंशन योजना, रूपे डेबिट कार्ड, आरोग्य विमा अंतर्गत येणार्या विमा संरक्षणाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यात ऊत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे खातेदारांना आवाहन केले.
या प्रसंगी मुख्य कार्यालयातील मुख्य व्यवस्थापक शन्मुख वानखेडे यांनी ऊपस्थित राहून मार्गदर्शन केले. बचत खात्यास आधार व मोबाईल लिंकेज करून केंद्र सरकारची संपूर्ण आर्थिक व वित्तीय समावेशनाच्या प्रक्रिया व मोहीम आपापला सहभाग नोंदवून खातेदारांनी यशस्वी करावा.
असे आवाहनही वाळूज शाखेचे मुख्य व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी शेवटी केले. कार्यक्रमाला घाणेगावचे सरपंच केशव गायके, ऊपसरपंच सुधाकर गायके,पोलीस शाम फाळके पाटील, सोसायटी चेअरमन रामभाऊ गोरे
यांच्यासह स्थानिक नागरिक व शेतकर्यांची ऊपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय एकनाथ राऊत व बँक मित्र धनंजय कुळकर्णी यांनी बायोमेट्रिक मशीनद्वारे अनेक शेतकर्यांचे तात्काळ नो फ्रिल बचत खाते ऊघडून विशेष परिश्रम घेतले.