March 23, 2026

  1. वाळुज महानगर, (ता.24) – गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न करताना मॅक्झिन अडकल्याने त्यानंतर चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा थरारक प्रकार बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात असलेल्या एका डायनास्टिक सेंटर समोर बुधवारी 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर परिसरातील प्रताप चौक येथे बुधवारी 24 सप्टेंबर रोजी रात्री 8.35 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी एका तरुणाचा खून करण्यासाठी पिस्तूल काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी पिस्तूलमध्ये मॅक्झिन अडकले. त्यामुळे त्याचा गोळी झाडण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान जीवावर बेतलेल्या तरुणाने पळ काढताच आरोपीने धारदार चाकूने वार करून भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. हा थरारक प्रकार बुधवारी 24 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकातील एका. डायनास्टिक सेंटर समोर घडला. या घटनेत भोळाराम शामराव कडमीचे वय 32 असे जखमीचे नाव असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी पडलेले मॅग्झिन व काडतूस ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे.

बजाजनगरात तणावाचे वातावरण –
या घटनेमुळे बजाजनगर येथील प्रताप चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनातील हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, हल्ल्याचा उद्देश व पार्श्वभूमी काय आहे याचा तपास सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *