February 5, 2026

वाळूजमहानगर (ता.05) – वाळूज परिसरातील गोलवाडी येथे सहा ग्रामपंचायत सदस्य व एक सरपंच पदाच्या जागेसाठी रविवारी (ता. 5) रोजी घेण्यात आलेल्या मतदानात एकूण 857 मतदानापैकी 694 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी सरासरी 81 आली आहे. उद्या मतमोजणी असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

वाळूज परिसरातील गोलवाडी ग्रामपंचायतची सदस्य संख्या 7 असून सरपंच पद स्वतंत्र असून ते ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. सात ग्रामपंचायत सदस्यांपैकी एक महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित सहा ग्रामपंचायत सदस्यांसाठी आणि सरपंच पदासाठी रविवारी (ता.5) रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी चार पॅनल रिंगणात उतरले होते. अत्यंत शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता झालेल्या या निवडणुकीत एकूण 857 मतदारांपैकी 694 जणांनी मतदान केले. तीन प्रभागांसाठी तीन मतदान केंद्रांमधून घे मतदान घेण्यात आले.

यावेळी केंद्र प्रमुख म्हणून राजेंद्र वाघमारे, आर यु बोडखे आणि हबीब शेख यांनी काम पाहिले. या निवडणुकीत एकूण 418 महिला मतदारांपैकी 346 महिलांनी तर 439 पुरुष मतदारांपैकी 348 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान छावणी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंग चव्हाण यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *