वाळूजमहानगर, (ता.24) – महाराष्ट्र शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी घातलेली असताना सुद्धा गोमांस ताब्यात बाळगणाऱ्या एका आरोपीस जेरबंद करून त्याच्या ताब्यातून दहा हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमात जप्त केला. कारवाई आंबेलोहळ येथे सोमवारी (ता 24) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा असे असा, गोवंश कत्तलीवर महाराष्ट्र शासनाची बंदी असतांना देखील गोवंश कत्तल करुन मास विक्री करण्याच्या उद्देशाने गोमांस ताब्यात बाळगताना आरोपी अरबाज सलीम कुरेशी रा.आंबेलोहळ ता. गंगापूर हा मिळून आला. त्याच्या ताब्यातून गोमांस व ते कापण्यासाठी वापरावयाचे वेगवेगळे सुरे असा एकूण 10 हजार 650 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी ता 24 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर पोलीस हेडकॉन्स्टेबल टी के पवार पोलीस अंमलदार बाळासाहेब देवबोने यांनी आंबेलोहोळ येथील गावाबाहेरील एका मस्जीदजवळ केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब देवबोने
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
