
वाळुज महानगर, (ता.11) – कायगाव येथील गोदावरी नदीत एका 25 वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हा प्रकार शुक्रवारी 11 जुलै रोजी सकाळी उघडकिस आला.
गंगापूर येथील कायगाव टोक्याच्या गोदावरी नदीत कोपरगाव येथील अतुल उबाळे या 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी 11 जुलै रोजी सकाळी हा प्रकार उघडकेला आल्याची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, रोहित शिंदे, अमोल बिरुटे, पंकज बिरुटे यांनी तात्काळ गोदावरी नदीतून मृतदेह बाहेर काढून गंगापूर घाटी येथे दाखल केला.
तो वाहून आला असावा –
अतुल उबाळे याचा हा मृतदेह असून तो कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याचा गेल्या तीन चार दिवसापूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय तो कोपरगाव येथील असल्याने नदीच्या प्रवाहात तो वाहून आला असावा अशी शंकाही वर्तविण्यात येत आहे.
