March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.10) – – गुरुपौर्णिमा निमित्त लिंबे जळगाव येथील सप्तशृंगी माता मंदिर व हनुमान मंदिर येथे अभिषेक पूजा व महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी 10 जून रोजी करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमा निमित्ताने लिंबेजळगाव येथील सप्तश्रृंगी माता मंदिरात शनिवारी (दि.10) रोजी वाळुज येथील ज्ञानेश्वर पाटील बोरकर यांच्या वतीने सकाळी देवीच्या मूर्तीला अभिषेक व आरती करण्यात येईल. त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा यावेळी ह.भ.प. विजयदास महाराज सप्तशृंगी माता मंदिर यांचे प्रवचन होऊन महाप्रसाद वाटप होणार आहे.
याशिवाय लिंबेजळगाव येथील हनुमान मंदिरात सकाळी सहा वजता जय हाडुळे यांच्या हस्ते अभिषेक होऊन महाप्रसादाचे वाटप होणार आहे. लिंबेजळगाव व परीसरातील भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे अवाहन विजयदास महाराज खेडकर श ग्रामस्तातर्फे करण्यात आले आहे.
————==

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *