
वाळूजमहानगर, (ता.21) – लग्न जमवण्याच्या कौंटुबीक कारणावरुन मनात राग असलेल्या एका तरुणाने मेडीकल दुकानात घुसुन शिवीगाळ करून तोडफोड केली. ही घटना सोमवारी (ता.20) रोजी सकाळी 11 वाजता गुरुधानोरा येथे घडली.
कृष्णा आप्पासाहेब गवांदे रा.गुरुधानोरा ता.गंगापुर असे या प्रकरणातील आरोपीचे नांव आहे. पोलीसांनी सांगितले की, लक्ष्मण विष्णु डहाळे यांची गुरुधानोरा येथे मेडीकल स्टोअर्स असुन लक्ष्मण व कृष्णा यांच्यात लग्न जमवण्याच्या कौंटुबीक कारणावरुन वाद आहे. घटनेच्या दिवशी लक्ष्मण यांचा लहान भाऊ भगवान हा सकाळी मेडिकल उघडुन बसलेला असताना लाल रंगाच्या पल्सर गाडीवरून कृष्णा आप्पासाहेब गवांदे हा मेडीकलवर येऊन धडकला. काही एक न विचारता मेडिकलमध्ये घूसुन शिवीगाळ करून काऊंटरचे व रँकची तोडफोड करून नुकसान केले. झटापटीत कृष्णाच्या हाताला काचेचा तुकडा लागुन जखम झाली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात भगवान विष्णू डहाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कृष्णा आप्पासाहेब गवांदे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
