March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.1) – गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल जोगेश्वरी येथे विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मंगळवारी (ता.28) रोजी करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे संचालक अण्णासाहेब जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी कम्प्युटरचे संचालक पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा कांगुणे, पालक म्हणून प्रिया शिंदे उपस्थित होत्या.

प्रथम उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुलांनी विविध विज्ञान प्रयोग सादरीकरण केले. या विज्ञान प्रदर्शन आला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विज्ञान शिक्षक म्हणून जानवी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील सहशिक्षिका प्रिया लोखंडे, चंदा टकले, कोमल निकाळजे, कविता सोनवणे, कविता जोशी, पूजा उबाळे, विद्या सपकाळ यांचे सहकार्य लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *