February 5, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.31) – गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल जोगेश्वरी या शाळेमध्ये स्नेहसंमेलन हा सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात झाला. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून आमदार सतीश चव्हाण होते. माजी महापौर नंदकुमार घोडेले, काँग्रेसचे सुनील मगरे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

राजश्री शाहू कला शाखेचे उपप्राचार्य मधुकर चाटसे, योगेश दळवी, विश्व हिंदू परिषद प्रमुख चेतन यादव, माजी सभापती ज्योती गायकवाड, पंचायत समिती सदस्य दीपक वडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमित भैय्या त्रिवेदी, दिनकर पाटील, अविनाश गायकवाड आदींची उपस्थिती होती. प्रथम अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत समारंभाचा कार्यक्रम शाळेचे संचालक अण्णासाहेब जाधव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा कांगुणे, अमोल जाधव, सचिन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

 

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, अभिनय, कला सादर केल्या .पोवाडा, भारुड यासारखे कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आले. यावेळी
नृत्य दिग्दर्शक म्हणून युवराज सर, जानवी गायकवाड, पूजा उबाळे यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता सोनवणे, चंदा टकले, कविता जोशी, कोमल निकाळजे, प्रिया लोखंडे, आरती हिवाळे, विठ्ठल झुटे, सुगंधा देशमुख आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या वाघळे, वैष्णवी जगदाळे यांनी केले. तर
आभार जानवी गायकवाड यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *