वाळूजमहानगर, (ता.28) – दहावीच्या परीक्षेत सलग तीन वर्ष 100 टक्के निकाल व यशाची परंपरा कायम राखत गुरुकुल इंग्लिश स्कूल जोगेश्वरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेतील अतिशय हुशार शांत आणि बेस्ट स्टुडंट चा अवॉर्ड घेणारी वैष्णवी अनिल जगदाळे हिने 85.80 गुण घेऊन शाळेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्याचबरोबर संजना सुनील काळे 84.40 गुण घेऊन द्वितीय तर तन्वी संतोष राऊत या विद्यार्थिनी 84.20 गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक अण्णासाहेब जाधव रामराईकर, शाळेचे एडमिन अमोल जाधव, सचिन जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा कांगुणे यांनी स्वागत केले.