March 24, 2026

वाळूजमहानगर (ता.23) – बजाजनगर येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगौर उत्सवानिमित्त गुढी पाडव्याचे औचित्य साधून बुधवारी (ता.22) रोजी शोभायात्रा काढून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या शोभायात्रेत समाजातील महिला डोक्यावर कळस घेऊन पारंपारिक वेषभूषा करून सहभागी झाल्या होत्या.

राजस्थान संस्कृतीत प्रमुख मानला जाणारा गणगौर हा सण बजाजनगर येथे माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 16 दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान गुढी पाडव्याला बजाजनगरातून शोभायात्रा काढली जाते. हा गणगौर उत्सव सुमारे दोन दशकापासून बजाजनगर येथे साजरा करण्यात येत आहे.

शिव पार्वतीच्या पूजनातून साजरा करण्यात येणारा हा सण राजस्थानी संस्कृतीमध्ये प्रमुख मानला जातो. होळीच्या दुसर्या दिवसापासून प्रारंभ होऊन सोळा दिवस हा सण चालतो. सुख, सौभाग्य प्राप्तीसाठी विवाहित महिला तर सुयोग्य वर प्राप्तीसाठी कुमारिका हा सण साजरा करतात.

या गणगौर सणाचाच एक भाग म्हणून गुढी पाडव्यानिमित्त बुधवारी (ता.22) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता
बँड पथकाच्या उपस्थितीत महिलांनी डोक्यावर कळस घेऊन गणपती मंदीरापासून गौरीची मिरवणूक काढली.

या मिरवणुकीत माहेश्वरी मंडळाच्या महिलांनी पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजया काबरा, उमा भन्साळी, किरण राठी, शितल मोदाणी, विद्या सारडा यांनी सहकार्य केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *