
वाळूजमहानगर, ता.10 – विनापरवाना व बेकायदेशीर रित्या गुंगीकारक पदार्थ विक्री करण्यासाठी दुचाकीवर आलेल्या दोघांवर सायबर शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या. तिच्या ताब्यातील उद्देमाला सह 56 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. कारवाई सहजापूर शिवारात सोमवारी ता 9 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील सहजापूर शिवारात दोन इसम गुंगीकारक औषधी विक्रीसाठी येणार आहे. अशी माहिती सायबर शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी (ता.9) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास सहजापूर शिवारात सापळा रचून आरोपी सय्यद वसीम सय्यद सऊद, वय 35 वर्षे, रा. गल्ली नंबर 3 रहिमनगर, अल्तमश कॉलनी, छत्रपती संभाजीनगर. विजय बलबीर रावळकर (24)रा. रहीमा मस्जीदजवळ, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील दुचाकी व गुंगीकारक औषधी पदार्थ असा 56 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे ही औषधी आरोपींना विकणाऱ्या सहजापूर येथील मेडिकल चालक विजय भास्करराव भुमैहा कोडीगंटी वय 42 वर्ष रा. बजाजनगर भोडवे शाळा समोर छत्रपती संभाजीनगर याला सुद्धा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
