March 22, 2026


वाळूज महानगर, (ता.2) – राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सखी यांचे 30 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या 5 दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे आयोजित करण्यात आले आहे.


या प्रशिक्षणात वैजापूर, गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील एकूण 52 कृषी सखी सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाला निवृत्त कृषी अधिकारी प्रदीप चौबे, प्रशिक्षण समन्वयक स्वप्निल वाघ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *