February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.12) – मित्रासोबत किरायाच्या घरात राहणाऱ्या एकोणावीस वर्षीय तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.12) रोजी सकाळी म्हाडा कॉलनी, जय भवानीनगर येथे उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनाईक, ता. पुसद जि. यवतमाळ येथील धनंजय हरिदास सोंळके हा 19 वर्षीय तरुण कामगार वाळुज औद्योगिक वसाहतीत काम करत होता. तो मित्रा सोबत म्हाडा कॉलनी, जय भवानीनगर येथे किरायाच्या घरात राहत होता. सोमवारी रात्री दोघे रूम झोपलेले असतांना धनंजय यांने रात्री दोरीच्या सह्याने लोखंडी गजाला गळफास घेतला. त्यास बेशुध्द अवस्थेत सकाळी वाघु पवार व अतुल भास्कर यांनी उपचार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मंगळवारी सकाळी 9. 15 वाजेच्या सुमारास मृत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राम तांदळे हे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *