वाळूजमहानगर, (ता.12) – एका 53 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही. ही घटना शुक्रवारी (ता.12) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास वाळूज येथे उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील झेंडा मैदाना जवळील सोनार गल्लीत राहणाऱ्या लक्ष्मण दत्तात्रेय शहाणे वय 53 या यांनी राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी (ता.12) सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस येताच शहाणे यांना बेशुद्ध अवस्थेत वाळुज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन त्रिभुवण, रोहित श्रीमाळी, अरुण श्रीमाळी यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून 8 वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. शहाणे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

