
वाळूजमहानगर (ता.27) – राहते घरी छताच्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन 39 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. वाळुज येथील शिवाजीनगर परिसरात असलेल्या श्रीरामनगर येथे घडलेली ही घटना सोमवारी (ता.27) रोजी पहाटे उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस आर दिलवाले हे डी ओ अधिकारी म्हणून ड्युटीवर असताना त्यांना सोमवारी (ता.27) रोजी पहाट भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की, वाळूज येथील शिवाजीनगर परिसरात श्रीरामनगर येथे राहणाऱ्या कृष्णा बाबुराव माने वय 39 या इसमाने गळफास घेतला आहे. त्यामुळे डीओ अधिकारी एस आर दिलवाले, सचिन खरात, विकास जाधव, झुरळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे कृष्णा बाबुराव माने हा छताच्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला. त्यास तात्काळ खाली उतरून उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी 3.30 वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल किरण जाधव करीत आहे.
