March 24, 2026


वाळूजमहानगर (ता.6) – छत्रपती संभाजीनगर शहरातील सुराणानगर येथे राहणाऱ्या 42 वर्षीय इसमाने वाळूज परिसरातील एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.4) रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

चेतन रविंद्र जैस्वाल वय -42 वर्षे रा. सुरानानगर, छत्रपती संभाजीनगर असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. त्याने वाळूज परिसरातील सोलापुर धुळे हायवेवरील तनवानी शाळेच्या समोरील छोट्या तळ्याजवळील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहय्याने गळफास घेतला. मंगळवारी (ता.4) रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच चेतन जैस्वाल याला बेशुद्ध अवस्थेत आभिजीत जैस्वाल यांनी घाटीतील अपघात विभागात आणुन दाखल केले असता डॉक्टरांनी चेतन यास तपासुन 8.15 वाजता मयत घोषित केले. या प्रकरणी एस आर गवळी यांनी दिलेल्या माहितीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *