
वाळुज महानगर, (ता.23) – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन, स्केलपट्टी आदी लेखन साहित्य वाटप जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव (को.) येथे बुधवारी 23 जून रोजी करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये आदर आणि पालकांमध्ये आदर्श व्यक्तिमत्त्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद शाळेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळेमध्ये नियमित उपस्थित असणारे आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य वाटप हा स्तुत्य कार्यक्रम बुधवारी 29 जुलै रोजी राबविण्यात आला. या शालेय साहित्याचा सदुपयोग करून गावाचे व शाळेचे नाव लौकिक करण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा शिक्षणप्रेमी कृष्णाभाऊ साळे यांनी यावेळी केले. प्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.
लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याविषयी व चरित्राविषयी डॉ.हरिश्चंद्र रामटेके यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
