
वाळुज महानगर (ता.13) :- ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त कलानगर, वाळूज येथील श्री गजानन महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप दादा महाराज वायसळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाचे अन्नदाते माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक छोटू दादा कुंजर, माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, तालुकाप्रमुख दिनेश मुथा पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.13) रोजी मोठ्या उत्साहात झाली.
यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथ मिरवणुकीत ‘गण गण गणात बोते’ च्या गजराने परिसर दुमदुमला होता. मिरवणुकीच्या मार्गातील भाविकांनी ठीकठिकाणी श्री गजानन महाराज यांच्या ग्रंथाचे पूजन केले.
