- गणेश पिंपळे दोन वर्षीसाठी तडीपार
चोऱ्या माऱ्यासह अवैध दारू विक्री व गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी करणारा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार गणेश पिंपळे याला दोन वर्षीसाठी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून शुक्रवारी (ता.26) रोजी तडीपार करण्यात आले.
गणेश दिलीप पिंपळे (29) रा.टोकी ता. गंगापूर हा कुख्यात गुंड असून तो चोऱ्या मार्यासह विविध गुन्ह्यांतील आरोपी आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी तयार करून वरिष्ठाकडे पाठवला होता. या प्रस्तावाची चौकशी करून परिमंडळ 1 पोलिस उपआयुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी पिंपळे यांच्या तडीपारीचे शुक्रवारी (ता.26) रोजी आदेश काढले. पिंपळे याच्यावर अवैध्य दारू विक्री, दुकान, विविध कंपन्यामध्ये चोर्या करणे यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल आहेत. शिवाय तो वाळूज व परिसरात राहिल्यास जनतेच्या मालमत्तेसह सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्याच्यावर ही तडीपारची कारवाई करण्यात आली.