February 5, 2026
वीज पुरवठा खंडित न करण्याबाबत निवेदन देताना येथील गावकरी

वाळूज महानगर – गणेशोत्सव तसेच सार्वत्रिक सण उत्सव साजरा करण्याचे सरकारचे धोरण आहे. बुधवार (ता.31) आगस्टपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित करू नये. अशी मागणी जिकठाण येथील गावकऱ्यांनी केली आहे.
तुर्काबाद (खराडी) येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अमोल खंडागळे यांना ग्रामपंचायतच्या लेटरहेडवर दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही खालील सह्या करणारे ग्रामस्य तसेच गणेश भक्त – जयश्रीराम गणेश मंडळ व भाविक जिकठाण, मिर्झापुर, सुलतानपुर आपणास सविनय विनंती करण्यात येते की, सध्या शासनाच्या धोरणानुसार “गणेशोत्सव” तसेच सार्वत्रिक सण, उत्सव उत्सवात साजरा करण्याबाबत सरकारचे धोरण असल्यामुळे जिकठाण, मिर्झापुर, सुलतानपुर येथे गणेशोत्सव काळात विजपुरवठा खंडीत न करता नियमित सुरु ठेवण्यात यावा. अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच गोरखनाथ जैस्वाल, उपसरपंच मीरा जाधव, ज्ञानेश्वर खोमणे,शहीद गनी शेख, उषा सोळस, कैलास खोमणे, उद्धव खोमणे, सुनील सोळस, फकीरचंद म्हस्के, संदेश वाकडे, बाळू जाधव, आनंद पंडीत, रामेश्वर खोमणे, योगेश रोकडे, तुकाराम जाधव, आप्पा पानकर, कृष्णा तोडकर, अमोल खोमणे, विशाल थोरात, बाळचंद बोडखे, बबन मुळे, भावराव मुळे, विकास मुळे, संजय मुळे, किरण जाधव, रोहन भगुरे, कैलास भगुरे आदींची नावे व सह्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *