March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.24) – वडगाव तलाठी मध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा उपचार घेत आहेत. या प्रकरणातील आरोपीस अटक करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

वडगाव कोल्हाटी येथील वडगाव – साजापूर रोडवरील हॉटेल साई गार्डन रेस्टारंट या हॉटेलमध्ये राजू मुरकुटे व ज्ञानेश्वर देवरे यांना अमानुषपणे मारहाण झाली होती. शनिवारी (ता.23) रोजी पहाटे दोन ते तीन वाजे दरम्यान झालेल्या या मारहाणीमध्ये राजू मुरकुटे याचा मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर देवरे हा उपचार घेत आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खुनाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहे. पुढील तपास करत असताना पोलिसांनी आरोपी ओम बुळे, सागर ढवळे, अंकुश मानकर यांना अटक करून रविवारी (ता.24) रोजी न्यायालयासमोर हजर केले असता तिघांनाही 27 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *