March 25, 2026

वाळूजमहानगर, (ता.27) – आपापसात नातेवाईक असलेल्या सात जणांनी एकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुणाचा गुन्हा दाखल होताच फरार असलेल्या आरोपीस वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (ता.26) रोजी जेरबंद केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारहाण केल्याने जखमी झालेला अनिल शालीन पिंपळे (31) रा. अंबेलोहळ ता. गंगापुर हा उपचार दरम्यान मयत झाला होता. याप्रकरणी 7 आरोपींवर ‘खुनाचा गुन्हा दाखल असुन यातील काही आरोपी हे गुन्हा केल्यापासुन अटक चुकवण्याचे उद्देशाने फरार झाले होते. फरार आरोपींचा एमआयडीसी वाळुज पोलीस कसोशीने शोध घेत असताना मंगळवारी (ता.26) रोजी सपोनी गौतम वावळे यांना गुप्त माहीती मिळाली की, फरार असलेला आरोपी विशाल संजय चव्हाण हा शंकरफाटा जोगेश्वरी येथील पारधी वस्तीवर नातेवाईकाकडे येत आहे. या माहितीवरून वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गौतम वावळे व पथकाने शंकरफाटा येथील पारधीवस्तीवर सापळा लावला असता आरोपी विशाल चव्हाण हा तोंडास रुमाल बांधुन ओळख लपवुन एका घराचे पाठीमागे गेला. मात्र आरोपी विशाल चव्हाण यास पोलीसांची चाहुल लागताच तो घराचे पाठीमागील काटवनाचा फायदा घेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीसांनी विशाल चव्हाण याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोनि. अविनाश आघाव, दुय्यम पोनि. गणेश ताठे, विशेष तपास पथाकाचे सपोनि. गौतम वावळे, पोउपनि. दिपक रोठे, पोना. धिरज काबलीये, सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, सुरज अग्रवाल, नितीन इनामे, सुरेश कचे, हनुमान ठोके, राजाभाऊ कोल्हे, सतवंत सोहळे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *