March 23, 2026

वाळुज महानगर – श्री संत सावता मंदिर ट्रस्ट रांजणगाव येथे चालू असलेल्या श्री संत रामलाल बाबा गेंदाआई भोपळे महाराज यांच्या सप्ताह निमित्त श्री संत सेवा बहुउद्देशीय मंडळ रांजणगाव (शेणपुंजी) यांच्यातर्फे सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल खासदार संदिपान भुमरे यांना गुरु स्मृती पुरकार देण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात झाला.


श्री संत सेवा बहुउद्देशीय मंडळ रांजणगाव (शेणपुंजी) च्या वतीने दरवर्षी श्री संत रामलाल बाबा गेंदाआई भोपळे महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन सामाजिक शैक्षणिक कार्य करणाऱ्यांना गुरुस्मृती पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून ‘गुरुस्मृती पुरस्कार सोहळा 2025’ चे सत्कारमूर्ती म्हणून छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांची निवड करण्यात येऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना खासदार संदिपान भुमरे यांनी मंडळाच्या या कार्याचे कौतुक करून अशा कार्यक्रमातून सामाजिक एकोपा वाढीस लागतो. असे प्रतिपादन केले.


या कार्यक्रमात खासदार संदिपान भुमरे यांच्यासह सुकलाल महाराज पैठणकर, सरपंच कविता हिवाळे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, गोरखनाथ हिवाळे, डॉ. सुरेश दायमा, समाजसेवक गोपीचंद मुंदडा यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच कविता हिवाळे, उद्योजक बाबुराव हिवाळे, माजी सरपंच योगिता महालकर, उद्योजक प्रभाकर मालकर, चेअरमन गोरखनाथ हिवाळे, दत्तू हिवाळे आदींची उपस्थिती होती. या गुरुस्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाला रांजणगाव (शेणपुंजी) येथील गावकरी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————–

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *