
वाळूजमहानगर, (ता.2) – भरधाव जाणाऱ्या खाजगी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. सिडको वाळूज महानगर दोन जवळ बुधवारी (ता.29) रोजी दुपारी झालेल्या या अपघाताप्रकरणी शनिवारी (ता.2) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या अपघाताविषयी मिळालेली माहिती अशी की, सुमिती चव्हाण व त्याचा मित्र नितेश शर्मा असे दोघे बुधवारी (ता.29) रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास एक्टिवा दुचाकी (एम एच 20, डी एच-5297) ने कांचनवाडी येथून सोलापुर धुळे हायवेने येत असताना साऊथ सिटी महानगर-2 येथे पाठीमागून येणाऱ्या खाजगी बस (एम एच 15, जी व्ही -5969) ने ॲक्टीव्हा दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सुमित चव्हाण व नितेश शर्मा हे जखमी झाले. याप्रकरणी भगवान नामदेव चव्हाण रा. इंदिरानगर पंढरपूर ता.जि.छत्रपती संभाजीनगर याच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी खाजगी बसचा चालक बाळकुष्ण गोविंद खाडे रा- नाशीक वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 279, 337, 338, 427 भादंवि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
