वाळूजमहानगर, (ता.29) – क्वॅलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (क्यू सी एफ आय) छत्रपती संभाजीनगर शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी संजय वैद्य तर सचिवपदी संदीप गरुड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड 2024 ते 2027 या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
उ. र्वरित पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष अमोल गिरमे व अस्मिता जोशी, कोषाध्यक्ष सुधीर पाटील, मानद सचिव राहुल देशपांडे, सहसचिव हेमंत सोनावणे, तसेच कार्यकारी सदस्य म्हणून अश्विनी देऊळकर, योगिता बोरुडे, मंगलदास चोरगे, राजेंद्र पवार, सुदर्शन धारूरकर, विजय अडलक, महेंद्र वानखेडे यांचा समावेश आहे.
ही संस्था प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता विकासासाठी कार्य करते. देशभरात या संस्थेच्या 34 शाखा असून जपान, चीन, कोरिया, सिंगापूर या सारख्या 20 देशांमध्ये यांचे कार्य चालते. औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाचा सर्वांगीन विकास करून दर्जेदार मनुष्यबळ तयार करणे आणि त्याद्वारे गुणवत्ता विषयक समस्यांचे निराकरण करून दर्जेदार उत्पादने तयार करण्यासाठी ही संस्था मार्गदर्शन करते. गुणवत्ता विकासाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये गेली 25 वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. अशी माहिती क्वालिटी सर्कल फॉर्म ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समितीचे पश्चिम विभाग संचालक नितीन किनगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.