क्वॅलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे 22वे संमेलन उद्या
वाळूजमहानगर rknewslive – क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे 22 वे सम्मेलन शनिवारी (ता.20) ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले असून इच्छुक उद्योगाने आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया औरंगाबाद तर्फे करण्यात आले आहे.
हॉटेल अतिथी येथे 100 च्या वर संघांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या संमेलनात जवळपास 80 कंपन्यांचे आता पर्यंत नोंदणीकरण झाले आहे. हे संम्मेलन यशस्वी करण्यासाठी, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहे. या संमेलनात क्वालिटी सर्कल, कायझन, 5-S, पोका योके, एसएमईडी, टीपीएम, सेफ्टी हेल्थ इन्व्हायरमेन्ट, इत्यादी विषयाच्या सादरीकरणाला वतंत्र पारितोषिके दिले जाणार आहे. सुवर्ण चषक व मुख्य चषक विजेता संघ हे डिसेंबर मध्ये औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळी वरील स्पर्धेसाठी पात्र राहतील. हे संमेलन विभागीय पातळी, राष्ट्रीय पातळी व आंतरराष्ट्रीय पातळी अश्या तीन पातळीवर आयोजित केले जाते.