वाळुज महानगर – दीपावलीनिमित्त फटाके खरेदी करून घरी परतणाऱ्या तीन जणांच्या भरधाव क्रेटा कारला ढोरेगावजवळ भीषण अपघात झाला. सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारमधील एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की,
छत्रपती संभाजीनगर येथील राज चेतन चव्हाण (वय 24), सुमित साळुंके (वय 21) व सोहन आहेरकर (वय 21) असे तिघे जण दीपावलीनिमित्त फटाके करण्यासाठी क्रेटा कार (एम एच 20, ई जे 63 93) मधून गंगापूर येथे गेले होते.

गंगापूर येथून फटाके खरेदी करून ते सर्वजण छत्रपती संभाजीनगरला येत होते. त्यांची क्रेटा कार ढोरेगाव येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ येताच कारचे टायर फुटल्याने 4 ते 5 पलट्या घेत कार थेट रोडच्या खाली गेली. या अपघातात कारमधील एक जण मृत तर दोघे गंभीर जखमीं झाले.
छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्गावर सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या
या अपघाताची माहिती मिळताच सारंगपुर मुक्कामी असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
नाणिजधाम यांच्या 24 तास सेवेत असणाऱ्या विनामूल्य रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी बाबा कराळे व शुभम वाघमारे यांच्या मदतीने सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले. 
मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी 3 जखमी पैकी एकाला मयत घोषित केले. अन्य दोन्ही जखमीवर उपचार सुरू आहेत.

