
वाळूजमहानगर, (ता.26) – दया, शांती, प्रेम, क्षमा या येशु शिकवणीवर रेव्ह आर व्ही दिवे पालक यांनी मार्गदर्शन करून सर्व क्राइस्ट चर्च मंडळी व सर्व भक्तगण यांना
मोलाचा संदेश दिला. यावेळी प्रभू येशूची भक्ती भावे आराधना करण्यात येऊन सर्वांनी एकमेकांना हॅपी ख्रिसमस म्हणून शुभेच्छा दिल्या. अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने क्राइस्ट चर्च वाळूज सी एन आय मध्ये येशू जन्म सोहळा, नाताळ सण भक्ती भावे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत चर्च सेक्रेटरी सदानंद साबळे, प्रभुदास साबळे, विजय साबळे, वाळुज गावातील ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब चापे पाटील, संजय भालेराव, दयानंद साबळे, योगेश नाडे, थॉमस साबळे, योसेफ साबळे, नितीन साबळे, नामदेव शिंदे, अमोल साबळे, जॉन साबळे, राहुल साबळे, दीपक साबळे, अजय माने, शुभम नाडे, सनी वडागळे, रोहित भालराव, काळू वडागळे, संदीप सरोदे, मुकेश साबळे, मनोज साबळे, कल्याण साबळे, आशिष शिंदे, नामदेव शिंदे, राजू साबळे, अनिकेत खंडागळे, संजय पवार, अप्पासाहेब वैरागळ, रोहन साबळे, छोट्या साबळे, सौरभ साबळे, अभिजीत निकाळजे, सिमोन चांदणे, नितीन भालेराव, सनी घुले, संदीप साबळे व महिला मंडळ तसेच
सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
