वाळूजमहानगर, ता.22) – कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया औरंगाबाद विभागातर्फे गुणवत्ता विकासाच्या संकल्पना या विषयावर एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन शनिवारी (ता.22) जुलै 2023 रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे.
या अधिवेशनात औरंगाबाद, नाशिक, पुणे विभागातून सुमारे 100 पेक्षा जास्त उद्योगांचे संघ सहभागी होणार आहेत. या परिषदेदरम्यान विविध गुणवत्ता संकल्पनांचे सादरीकरण उद्योगांमार्फत केले जाणार असून तज्ञ परीक्षकांमार्फत त्यांचे परीक्षण केले जाणार आहे. कायझन, फाईव्ह एस, एस एम इ डी, पोकेओके आदी विभागांमध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त संघाने सहभाग नोंदवला आहे. या परिषदेदरम्यान विजयी संघास पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मेटाफोर्ज इंडस्ट्रीजचे संचालक कौस्तुभ मेहता आणि देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिवूरकर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या सांगता समारंभास तसेच पारितोषिक वितरण समारंभास संजीव टेक्नो प्लास्टचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोकीळ आणि उमा सन्स ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक केदार देशपांडे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष नितीन किनगावकर यांनी दिली आहे.
