
वाळूजमहानगर – सुनेसोबत बोलत असताना सासऱ्याने का बोलत होता. असे विचारले असता कोयत्याने वार करून फरार झालेल्या एका आरोपीस वाळूज एमआयडीसी पोलीसांनी पकडून मंंगळवारी 23 डिसेंबर रोजी बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कृष्णा शिवाजी नवले रा. कासोडा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा एका महिलेसोबत बोलत असतांना तीच्या सासऱ्याने त्याला विचाराणा केली असता कृष्णाने कोयत्याने त्याच्यावर वार केला आणि पळून गेला. या प्रकरणी नाना भिवसन गुुुंडाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, फरार आरोपी कृष्णा नवले यास गन्हे शोध पथकाने आंबेलोहळ -कसोडा रस्त्यावरून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरिक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर पाटील, प्रविण पथरकर, पोलीस अंमलदार सुरेश कचे, नितीन इनामे, राजाराम वाघ, हनुमान ठोके, समाधान पाटील, संदिप तागड, रोहित चिंधळे, वैभव गायकवाड आदीच्या पथकाने केली.
