वाळूजमहानगर, (ता.11) – वाळुज महानगरातील बजाजनगर व सिडको वाळूज महानगर येथे बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या कॉफी कॅफेची निवेदनाद्वारे तक्रार करणाऱ्याच्या टपरीवजा हॉटेलची अज्ञात इसमांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिल्याने तक्रारदाराने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
वाळूज परिसरातील बजाजनगर व सिडको वाळूज महानगर येथील शाळा, महाविद्यालय व उच्चभ्रू वसाहतीत कॉफी कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना प्रायव्हसी मिळावी म्हणून काळ्या काचेचे कंपार्टमेंट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या ठिकाणी राज रोसपणे अनुचित व अनैतिक प्रकार सुरू असतो. तरुणांच्या विविध आमिषाला मुली बळी पडत असल्याने पलायन, छेडछाड, विनयभंग तसेच बलात्कारासारख्या घटना घडतात. त्यामुळे येथील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी तेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर येथील कॅफे डार्क लाईट व कॅफे मार्क 30 येथे छापेमारी करून सहा तरुण-तरुणींना तसेच दोन कॅफे चालकांना ताब्यात घेतले होते.
राग मनात धरून तोडफोड –
बजाजनगर येथील कॉफी कॅफे चालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून अज्ञात कॉफी कॅफे चालकांनी दहशत निर्माण करण्यासाठी तक्रारदार अमोल काळे पाटील यांच्या कामगार चौकातील टपरीवजा “रावजी चहा, नाश्ता” हॉटेलची तोडफोड करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर अमोल काळे यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
—-प्रतिक्रिया
अमोल काळे पाटील –



