
वाळूजमहानगर, (ता.23) – वाळुज परिसरातिल टेंभापुरी येथील कृष्णा केशव ढोले वय 25 या तरुणाने मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला आहे.
याबाबत ढोले यांनी घाटी दवाखान्यात लेखी दिलेल्या एका इच्छापत्रात असे नमूद आहे की, माझ्या मृत्यूनंतर माझे संपूर्ण शरीर शैक्षणिक किंवा इतर कार्यासाठी दान करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह संशोधन, विच्छेदन व इतर आवश्यक असलेल्या कोणत्याही हेतू करिता उपयोगात आणण्याची माझी तसेच माझ्या नातेवाईकांची काहीही हरकत नाही. या इच्छापत्रावर कृष्णा ढोले यांच्यासह आई नानीबाई ढोले चुलत भाऊ दत्ता ढोले व भाचा विकास तारक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
