February 21, 2025

कॅश क्रेडीट कर्जावरील व्याजदर कमी करण्याची
जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची मागणी
वाळूजमहानगर – संस्थेच्या हितासाठी व कर्जदार सभासद टिकुन राहण्यासाठी कॅश क्रेडीट कर्ज व्याजदर 11.50 टक्के वरून 10.50 टक्के करुन देण्यात यावा. अशी मागणी औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने दि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे केली आहे.
याबाबत औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेने दि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय अदालत रोड औरंगाबाद यांना दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेने आपल्या बँकेकडून सन 2022-2023 साठी 13.10 कोटी कॅश क्रेडीट कर्ज घेतलेले आहे. सदर कर्जाचा बँक व्याजदर दरसाल दरशेकडा 11.50 टक्के आहे. मात्र सर्व राष्ट्रीयकृत बँक अथवा ईतर बँका यांचा व्याजदर हा 8 ते 10 टक्के दरम्यान आहे. त्यामुळे संस्थेचे सभासद संस्थेच्या सभासदत्त्वाचा राजिनामा देऊन ईतर ठिकाणी कर्ज उचल करीत आहे. त्यामुळे संस्थेचे शेअर्स परत होऊन कर्ज वाटपावर परिणाम होत आहे. त्यामुळे आपण संस्थाला दिले जाणारे कॅश क्रेडीट कर्ज द.सा.द.शे. 10.50 टक्के प्रमाणे दिले तर संस्थेला दिलासा मिळून सभासद कर्जावरील व्याजदर कमी करुन सभासद टिकवून ठेवणे शक्य होईल.
दि.औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सह बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेला बँक द.सा.द.शे. 10.50 टक्के व्याजदराने कॅश क्रेडीट कर्ज देत आहे. त्याप्रमाणे आमच्या संस्थेलापण व्याजदर 10.50 टक्के करुन संस्थेच्या हितासाठी व बँकेच्या व्यवसाय वृध्दीसाठी कॅश क्रेडीट कर्जावरील व्याजदर 11.50 टक्के वरून बँक सोसायटीप्रमाणे 10.50 टक्के करुन देण्यात यावा. अशी मागणी औरगाबाद जिल्हा ग्रामसेवकाची सहकारी संस्था मर्यादीत औरंगाबादचे अध्यक्ष तथा इटावा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *